top of page

कराटे चॅम्पियन ते पोहण्याचा प्रवास

Updated: Sep 1, 2020


आयुष्य कसं कधी कसे रंग बदलेल हे कोणालाही सांगता येत नाही,  पण जर मन खंबीर आणि हिंमत असेल तर प्रतिकूल परिस्थितीवरही त्यावर मात करता येते,  हेच दाखवून दिले आहे आपल्या शम्स आलम याने. आजच्या माझ्या लेखांमध्ये मी आपणास कराटेचे फायदे  व त्यासोबत मुले मनाने खंबीर होतात हिंमतवान होतात,  याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे शम्स आलम.


 जेव्हा शम्स माझ्याकडे शिकायला आला, तेव्हा फक्त मी असं समजत होतो बिहार वरून आलेला एक साधारण मुलगा व  त्याच्या छंदा मुळे कराटे  शिकत आहे. जसे जसे दिवस उलटत गेले,  तसे त्याच्या कृतीतून आणि प्रॅक्टिस मधून मला जाणवू लागले कि या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. तेव्हा मी स्वतः त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला लागलो. शिकण्याची त्याची ती ओढ मला पण मनाला अजून काही शिकवण्यास प्रेरित करत होती. त्याचे कोणतेही काम झटपट करायचे व अतिउत्साह कधीकधी मला सतावत असे.  त्या वेळी मी त्याला काही कामे, धीराने करायची असतात हे शिकविले.  शम्सने  २००२ मध्ये ऑगस्ट च्या महिन्यात त्यांनी कराटे जॉईन केले.  त्यानंतर दोनच महिन्यांनी,  ठाण्यामध्ये क्रीडा सप्ताहानिमित्त कराटे चॅम्पियन शिपचे आमंत्रण आले होते,  त्यावेळी शम्स त्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची प्रबळ इच्छा दर्शवली होती.  तेव्हा मी त्याला बोललो थोडा अजून वेळ जाऊ दे, मग फाईट कर,  तरीपण तो ऐकला नाही, त्याने त्या फाइट मध्ये सहभाग घेतला आणि ती फाईट पण हरला. त्यावेळी त्याच्या मनाला पटले कि आपले प्रशिक्षक असे का बोलत होते. त्यानंतर २००३ मध्ये जांभोरी मैदान, वरळी येथे नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक पटकावले.  २००५ मध्ये कालिदास क्रीडा संकुलात झालेल्या कराटे नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये त्याने त्याच्या वयोगटात सुवर्णपदक पटकावले व त्यावेळी झालेल्या ग्रंड चॅम्पियनशिप मध्ये पण त्यांनी सुवर्ण पदक पटकावले. या घटनेची ची विशेषता अशी होती की,  शम्स  स्वतः ब्ल्यू बेल्ट असूनही त्याने ग्रँड चॅम्पियनशिपमध्ये उतरलेल्या सर्व ब्लॅक बेल्ट खेळाडूंना हरवून  सुवर्णपदकाचा वेध घेतला. ग्रँड चॅम्पियनशिप जिंकल्यावर आमच्या संस्थेच्या सर्व मुलांनी जल्लोष केला.  त्यावेळी मला झालेल्या आनंदाच्या भरात  मी त्याला स्वतः उचलुन घेतले होते, हे विशेष.


 अजून एक आठवणीतला किस्सा सांगायचा झाला तर  २००७ साली  ऐरोली येथे झालेल्या नॅशनल कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल घेतले व तेथे झालेल्या ग्रँड चॅम्पियनशिपमध्ये माझ्या असे लक्षात आले की शेवटचा पॉईंट जो विनिंग पॉईंट होता शम्सचा  होता तरीही समोरच्या खेळाडूला विजयी घोषित केले.  यावर आम्ही जोरदार आक्षेप घेऊन रेकॉर्डिंग दाखवली.  व ती फाईट परत  घेण्यात आली.  त्यात शम्स ने  जिंकून आपले कसब आणि प्रशिक्षकाचा आपल्यावर असलेला विश्वास सार्थ ठरवला. जे खेळाडू चांगले प्रदर्शन करतात, त्या फाईट बघायला प्रेक्षकांची आपोआप गर्दी जमत असते, आणि  शम्स हा हि यातीलच एक खेळाडू होता. आणि त्यातूनच ओळखता येते की फाइटर किती चांगला खेळाडू आहे. शम्स ने कराटे मधील बेल्ट परीक्षा पार  करीत ब्लॅक बेल्ट पूर्ण केला. त्याचबरोबर आमच्या एस एस के के ए चा चांगला फायटर म्हणूनही तो नावारूपास आला. जेव्हा कराटे इंटर कॉलेज युनिव्हर्सिटी स्पर्धे मध्ये गोल्ड मेडल जिंगला, तेव्हा आमच्या सर्वाना फार आनंद झाला. कधीकधी माझे व त्याचे वैचारिक मतभेद पण खूपदा व्हायचे. तरी पण मनाने कधीही आम्ही मनाने वेगळे झालो नाही. बरेचदा असे घडते की, क्लास मध्ये व इतर बाहेरच्या फाईट मध्ये चांगले खेळणारे खेळाडूंना काही स्वार्थी प्रशिक्षक अशा मुलांवर नजर ठेऊन  त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचाची प्रयत्न करीत. बऱ्याच वेळेस ते मला जाणवत असे, या बाबतीत माझे स्पष्ट मत असे आहे की अशा प्रशिक्षकांनी स्वतः मुलांना सुरवातीपासून अगदी प्राथमिक अवस्थेतून प्रॅक्टीस करवून त्यांना चांगले फायटर बनवावे. तरच तो खरा प्रशिक्षक. हे मी खास करून नमूद करू इच्छितो.

 

 शम्स हा फार चांगला फायटर म्हणून उदयास येत असताना अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धेची पदके पण त्याच्या खात्यात जमा झाली. पण देवाने त्याच्यासाठी काही वेगळेच लिहून ठेवले होते, एका पाठीत आलेल्या ट्युमर मुळे शम्सचा कमरेखालचा भाग काम करेनासा झाला. शम्सचा आयुष्यातील हा कठीण काळ होता, या दोन वर्षाच्या मधल्या काळात सायन हॉ्पिटलमध्ये मध्ये ट्रीटमेंट घेत असताना, मी व माझी पत्नी लक्ष्मी आठवड्यातून एकदा तरी नेहमी त्याची हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेत असू , त्याला मानसिक आधार देत असू.  याच दरम्यान  २०११ मध्ये आम्ही त्याला आमच्या कराटे कॅम्प मध्ये घेऊन गेलो, त्यात त्याने केलेल्या भाषणात सर्व मुले भावनिक बनली  होते,  त्यानंतर शम्सने विकलांग स्विमर साठी पॅरालिम्पिक स्विमिंग असोसिएशन, मुंबई  ही संस्था रजिस्टर केली,  त्यातही अध्यक्ष म्हणून माझे योगदान मी माझ्या परीने काम करून दिले. या संस्थेकरिता शम्स ने सचिव पदाचा धुरा वहिला. एक फायटर म्हणूनच असलेली ओळख  व कराटे मूळे शरीरात निर्माण झालेला लढवय्यापणा यावेळी शम्स ला उपयोगी आला. स्विमिंग मध्ये आंतरराष्ट्रीय पदकांचा वेध घेत अनेक पदके मिळवली, ५० मीटर बटरफ्लाय एस ५ प्रकारात राष्ट्रीय रेकॉर्ड धारक, १००, २००, फ्री स्टाईल रेकॉर्ड धारक, २०० वैयक्तिक मेडले रेकॉर्ड धारक. इंडियन ओपन पॅरा जलतरण अजिंक्यपद ४ सुवर्ण पदके बंगळुरू स्पीडो कॅनम जलतरण स्पर्धेत कॅनडा कांस्यपदक पॅराप्लेजिक जलतरणकर्त्यांद्वारे सर्वात लांब खुल्या समुद्राच्या पोहण्याचा रेकॉर्ड 2 लिम्का बुक आशियाई पॅरा गेम्स इंडोनेशिया जकार्ता २०१८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत १२ सुवर्ण ३ रौप्य व १ कांस्यपदक. १० वेळा टीईडीएक्स स्पीकर, जोश टॉक, विविध विद्यापीठांचे प्रेरक वक्ता. बिहार खेल रत्न पुरस्कार २०१८. बिहार सरकारचा खेल सन्मान. यूएस शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभाग २०१८ द्वारा अपंगत्व आणि क्रीडा मुत्सद्दी मधील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख नेता. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मोटिवेशनल स्पीकर पण झाला आहे. ही बाब आमच्या संस्थेसाठी निश्चितच गर्वाची आहे.


17 views0 comments

Comments


bottom of page