Offers Services to Vaishyavani Samaj
वैश्य वाणी समाज, गोरेगांव मुंबई
वैश्य समाज
ओबीसी स्टेटस, पोटजाती, आडनावे, गोत्र आणि कुलदैवत
वैश्य वाणी ही वैश्यांची उप-जाती आहे, जी हिंदू धर्माच्या वर्णांपैकी एक आहे. वैश्य वाणी पारंपारिकपणे व्यापारी आहेत आणि ते प्रामुख्याने कोकण, गोवा, किनारपट्टीवरील महाराष्टातील काही भाग, गुजरात आणि केरळच्या काही भागांमध्ये आढळतात. कोकणात कुडाळी (सावंतवाडीतील कुडाळ येथून येणारे), संगमेश्वरी (रत्नागिरीतील संगमेश्वर येथून) आणि पाटणे (सातार्यातील पाटण येथून) असे प्रादेशिक वाणी समुदायही होते. गोव्यात ते मराठी आणि कोकणी बोलीभाषा बोलतात. गुजरातमध्ये ते वैष्णव किंवा वैष्णव वणिक म्हणून ओळखले जातात. गोवा कदंबच्या काळात ते व्यापारी म्हणून ओळखले जात असे. सवोई वेरम, नार्वे, खांडेपार, कपिलाग्राम, बांदिवडे आणि तालीग्राममधील व्यापाऱ्यांचा संदर्भ १३५८ सालीच्या खंडेपर तांब्याच्या प्लेटमध्ये आढळतो.
वैश्य वाण्यांचा OBC स्टेटस:
A) CENTRAL- Government of India: ८ डिसेंबर २०११ च्या गॅझेट ऑफ इंडिया मधे "मिटकरी -वाणी" आणि "वाणी Wani" ओ. बी. सी. मधे समाविष्ट केले आहेत
त्याबाबतचा गॅझेट pdf फॉर्मट मधे दिला आहे.
B) STATE - Government of Maharashtra: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 44 व 45 नुसार राज्याच्या विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्ग यादीमध्ये नव्याने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत १ मार्च २०१४ रोजी जो जी.आऱ. काढला- (महाराष्ट्र शासन, सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांकः सीबीसी-10/2014/प्र.क्र.9/ मावक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-32, दिनांक १ मार्च २०१४) त्यानुसार वैश्यवाणी (वैश्य-वाणी, वै. वाणी, वैश्य वाणी, v. wani, पानारी) मागसवर्गीयांच्या यादीमधे समाविष्ट केल्याची नोंद आहे. शासन निर्णय - महाराष्ट्र राज्य मागासवगग आयोगाने शासनास सादर केलेल्या 44 व 45 अहवालातील शिफारसीनुसार "वैश्यवाणी, वैश्य - वाणी, वै. वाणी, वैश्य वाणी, v.wani, पानारी" यांना इतर मागासवर्गीयाांच्या यादीतील मूळ जातीसमोर समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे. (सदरचा GR शासन निर्णय क्रमाांकः सीबीसी-10/2014/प्र.क्र.9/ मावक मंत्रालय विस्तार भवन मुंबई -३२, दिनांक १ मार्च २०१४ , खाली PDF मध्ये जोडला आहे )
Caste Certificate जातीचा दाखला: मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटला भेट ध्या. ऑनलाइन सर्टिफिकेट साठी ही लिंक क्लिक करा https://rd.mahaonline.gov.in/en/RevenueHome/RevenueHome
वैश्य पोटजाती (महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक)
१) कोकणस्थ (संगमेश्वरी) वैश्य: सुरुवातीपासून या जातीला संगमेश्वरी वैश्य या नावाने नोळखले जात असे. १९०४ पासून या नावात बदल करून कोकणस्थ (संगमेश्वरी) वैश्य या नावाने ही संस्था ओळखली जाते. या जातीची लोकवस्ती मुंबई, कुलाबा, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात जास्त आहे. समाजाची मुळ वस्ती गोदावरीतीरी मुंगी पैठण येथे होती. दुर्गा देवीच्या दुष्काळामध्ये (साधारण कालखंड १३८८ ते १४०८) ह्या समाजाची पागापाग होऊन निरनिराळ्या घाटांनी हे लोक कोकणात उतरले आणि त्यावरुन त्यांना कोकणस्थ वैश्य हे नाव पडले.
या पोट-जातीतील आडनावे, गोत्र आणि कुलदैवताची संक्षिप्त माहिती खालील .pdf फाइलस मधे दिली आहे (स्क्रोल करा)
२) कुडाळदेशकर वैश्य: यांना आर्य वैश्य, ब्रह्म वैश्य, गोमंतकीय वैश्य व दक्षिण प्रांतस्य वैश्य अशी विविध नावे असली तरी कुडाळे वैश्य या सुप्रसिद्ध नावानेच ते ओळखले जातात. घाटावरुन कोकणात जेव्हा टोळ्या उतरल्या तेव्हा कुडाळ हा प्रांत होता व त्यावरुन ह्यांना कुडाळे ही संज्ञा प्राप्त झाली असावी. कुडाळ हा प्रांत पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात होता. सावंतवाडी संस्थान होण्यापूर्वी या भागाला कुडाळ असेच नाव होते. यांची मुख्य वस्ती सावंतवाडी शहर, कुडाळ, बांदे, आरवंदे, माणगाव, आकेरी, दापोली, दाणोली, आंबोली, गोमंतकमध्ये पणजी, म्हापसे, डीचोली, मडगाव, वास्को इथे, उत्तर कानडामध्ये मंगलोर, कोचीन, कारवार,गोकर्ण, बेळगाव जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात होती. या समाजाने व्यापारापेक्षा शिक्षणाला जास्त महत्त्व देऊन शैक्षणिक बाबतीत सर्वांगीण प्रगती केली आहे. याशिवाय, नोकरी व्यवसायांच्या निमित्ताने दृष्टीने मुंबई, पुणे व मुंबई उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात यांची वस्ती आहे.
या पोट-जातीतील आडनावे, गोत्र आणि कुलदैवताची संक्षिप्त माहिती खालील .pdf फाइलस मधे दिली आहे. (स्क्रोल करा)
३) नार्वेकर वैश्य: १६ व्या शतकात पोतुगीजांच्या धर्मछळामुळे अनेक वैश्य अनेक मार्गाने गोवा सोडून स्थलांतरित झाले. हे सर्व 'कुडाळे वैश्य' होते अशी इतिहासकारांची मते आहेत. काही कुटुंबे रामदुर्ग आंबोली (रामघाट) चोर्ले घाटामार्गे बेळगावात स्थलांतर झाली. नार्वेकडून हे लोक बेळगाव, कारवार जिल्ह्यात आले.
४) ठाणेकर वैश्य: हा समाज हा अंबरनाथ, आटगाव, बेलापूर, भिवंडी, बदलापूर, डोंबिवली, वसई, कुळगाव, कल्याण, खातिवली, खर्डी, मुरबाड, पडघा, शहापूर, टिटवाळा, ठाणे, वासिंद, विक्रमगड, वाडा, वज्रेश्वरी, जव्हार, इत्यादी भागात पसरलेला आहे. हा समाज या भागात केव्हा आला याचा पुरावा मिळू शकत नाही. परंतु बहुधा सोलापूर मार्गे बोरघाटातून ठाणे, भिवंडी व कल्याण भागात ते पसरले असावेत.
५) पाटणस्थ वैश्य: या जातीची लोकवस्ती गगनबावडा, भुईबावडा, पन्हाळा, भूदरगड तालुका आणि राधानगरी-चांदे या मार्गापासून थेट कोल्हापूरपर्यंत आढळते. रत्नागिरीच्या मध्य विभागात म्हणजे राजापूर आणि देवगड या दोन आहे. पाटण्यस्य वैश्याच्या वस्तीची मुख्य ठिकाणे म्हणून रायपाटण आणि खारेपाटण याची नावे घेता येतील.
६) पेडणेकर वैश्य: पोर्तुगीजांच्या छळाने व बाटवाबाटवीने गोव्यातील पेडणे गावाहून इ.स.१६०० व्या शतकात स्थलांतरित झाले. म्हणून याना पेडणेकर म्हणतात. याची वस्ती कारवार, होनावर, कुमठा आणि शिरशी येथे आहे. हे लोक नावा पुढे शेट लावतात.
७) बावकुळे वैश्य: हे सुद्धा १६०० व्या शतकात गोवा सोडून कारवार येथे आले. यांचा मुख्य धंदा, दुकानदारी व व्यापार,
८) माणगावकर वैश्य: ही एक वैश्य जमात रायगड जिल्ह्यातील रोहे, माणगाव आहे. त्याविषयी इतर माहिती मिळू शकत नाही. यांची लोकवस्ती रोहे व माणगाव तालुक्यात आहे.
९) बांदेकर वैश्य: इ. स. १६०० साली पोर्तुगीजांच्या धर्मछळाला घाबरून गोव्यातील बांद्याहून काही कुटुंबे गोव्याबाहेर गेली. त्यातले काही बेळगावला स्थायिक झाले. काही कारवार, अकोला, हल्याळ, कुमठा व होनावर येथे स्थायिक झाले. मूळ बाद्याहून आले म्हणूनबादेकर नाव पडले.
१०) आर्य वैश्य: महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या कोमटी वैश्यांना 'आर्य वैश्य' असे संबोधितात.आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीच्या आसपास, मछली-पट्टम् राजमहेंद्री या भागात यांची मूळ वस्ती होती. व्यापार, उद्योग,नोकरी इत्यादी कारणांमुळे येथील लोक भारतभर पसरले. त्यांनी त्या भागातील स्थानिक लोकांची भाषा, पेहराव स्वीकारून त्या लोकात ते मिसळून गेले. यांची लोकवस्ती विदर्भ-मराठवाडा, गंगाखेड, लातुर, नांदेड, धारुल, उदगीर, देगलूर, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, पुसद, खंडार, परळीवैज्ञनाथ-पुणे, मुंबई, उस्मानाबाद, परभणी, बीड, इत्यादी ठिकाणी आहे.