top of page

GURUMATH (गुरुमठ)

गुरुमाठाचा ईतिहास 

Gurumath 3.jpg

हळदीपूर मठाचा इतिहास साधारण अडीचशे वर्षांपूर्वीचा जूना असावा. मात्र पूर्व इतिहास व गुरुपरंपरा फारच जुनी असावी. कारण उत्तर कॅनरामध्ये इतर मठाची स्थापना साधारण इ.स. १४७५ च्या सुमारास झाली, त्यावेळी किंवा समकालीन आपल्या वैश्य मठाची स्थापना झाली असावी. म्हणजे ५५० वर्षांपूर्वी त्याच कालखंडात द्रवीड परंपरा म्हणजे मठाचा अधिकारी ब्राह्मणच असला पाहिजे हा नियमसुद्धा शिथिल झाला होता. श्री संस्थान हळदीपूर केरेगद्दे कृष्णाश्रम मठ उत्तर कॅनराच्या (कर्नाटक राज्य) होनावर ता क्यातील हळदीपूरमधील केरेगद्दे या गावी आहे. कुमठ्यावरून मंगलोरला जाणाऱ्या नॅशनल हायवेवरून आठ किलोमीटर वनश्रीनी नटलेल्या मार्गानंतर डाव्या बाजूला एक रस्ता जातो, तेथून आत गेल्यावर आपल्याला वैश्य समाज अस फलक दिसेल. तेथूनच थोड्याशा अंतरावर निसर्गरम्य व शांत परिसरात गुरुमठ आहे.

वैश्यांची गुरुपरंपरा शांताश्रमस्वामी, श्रीमत् कृष्णास्वामी, श्रीमत् शांतारामश्रमस्वामी, व श्रीमत् शांताश्रमस्वामी अशी आढळून येते. श्रीमत् शांताश्रम शृंगेरीच्या स्वामींनी कोणालाही शिष्य म्हणून न स्वीकारता १८८२ साली समाधी घेतली, त्या वेळेपासून गुरुपरंपरा खंडित झाली. मधल्या काळात युद्ध, अराजकता, लूटमार, मुला-बाळांना पळविणे, मंदिरे नष्ट करणे, खंडण्या वसूल करणे यामुळे सामान्य लोकांमधे भीतीचे वातावरण होते, यामुळे सामान्यजनाचा मठाशी संपर्क तुटल्याकारणाने आणि अस्थिर परिस्थितीमुळे गुरुपरंपरा खंडित झाली असावी. १८८२ नंतर १९२० सालापर्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या श्रद्धावान सेवाभावी, निष्ठावंत व्यक्तींनी मठाचा सांभाळ केला.

 

१९२० साली सेवा समितिची स्थापना झाली व ६.४.१९५३ साली ट्रस्टची स्थापना झाली व जिर्णोद्धाराचे काम  सुरू झाले. १९७२ पासून पुढे गोवा, केरळ, कर्नाटक, आणि महाराष्ट्रात वैश्यांची एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. गुरुमठ आकार घेत असतानाच भावी गुरुच्या शोधासाठी समाजामध्ये मंथन चालू झाले होते व त्याप्रमाणे चि. उपेश बाबूंची भावी गुरु म्हणून निवड झाली व शृंगेरीच्या शारदापीठामध्ये कुमार उपेश बाबूनी दिनांक २५.६.९३ रोजी शिक्षणास प्रारंभ झाला. एकीकडे गुरुमठाचा जीर्णोद्धार होत असतानाच दुसरीकडे आध्यात्म ज्ञानासारख्या गहन विषयासाठी ११ वर्षासाठी उपेशबाबूची तपश्चर्या सुरू झाली.  चि. उपेश बाबूंचा जन्म अर्नाकुलम जिल्ह्यात कोचीन तालुक्यात, श्री. पी गोपाल शेट व सौ. सुशीला या शिवभक्त दांपत्याच्या पोटी २.११.१९८१ रोजी झाला. श्री गोपालशेट हे विश्वामित्र गोत्रीय असून विष्णू हे त्यांचे कुलदैवत आहे. गोपाळ शेट यांना तीन मुले व तीन मुली. सर्वांचा जन्म कोचीनमध्येच झाला.

गुरुमठाचा विस्तार, जिर्णोद्धार पुर्णत्वास येत होता. गुरु आगमनाच्या प्रतीक्षेत वैश्य बांधव होते. ११ वर्षाचा काळ पूर्ण झाला होता. आणि श्रृंगेरी शारदापीठाचे स्वामी श्री. भारतीतार्थ यांनी १२.३.२००४ हा शुभदिन कुमार उपेशबाबुचा पट्टाभिषेक दिवस म्हणून जाहीर केले आणि वैश्याच्या आनंदाला भरती आली. गुरुमठामध्ये दिनांक ६ मार्च ते १३ मार्च २००४ पर्यंत अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिनांक ८ मार्च रोजी चित्रापूर गुरुमठाचे श्रीमत सद्याज्योत स्वामीजींच्या हस्ते श्री उपेशबाबूना समाजाचे गुरु म्हणून वैश्य समाजाकडे सुपूर्त करण्यात आले. त्यांचे “श्रीमत वामनाश्रम स्वामीजी- कृष्णाश्रममठ, हळदीपूर मठाधिपती म्हणून नामकरण करण्यात आले.

आमची  गुरुपरंपरा  श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने १२ मार्च २००४ साली चालू झाली

 

 

 

 

श्रीसंस्थान कृष्णश्रम मठ, हल्दीपुर, तलुका-हन्नावर (उत्तरा कन्नड).

पिन कोड - 581327.

फोन: 08387 254303,

ऑफिसः 08387 254999.

मेल: haladipurmath@gmail.com

Guru 5.jpg
bottom of page