top of page
About The School (शाळेची माहिती )
School Logo.png

ज्ञानमंदिर प्राथमिक शाळा , १६/ १३३-१३४, उन्नत नगर, ४ महात्मा गांधी रोड,गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400104

शिक्षणाचे माध्यम: मराठी 

वर्ग:  प्राथमिक विभाग पहिली  ते चौथी पर्यंत आणि  पूर्व-प्राथमिक विभाग   शैक्षणिक सत्र जून ते एप्रिल 

कामकाजाचे तास: सोमवार ते शनिवार सकाळी ८.०० ते दुपारी २.००  (रविवारी बंद) . फोन नं. ९७०२६३९७४८, ९८९२२९४२१९ 

गोरेगांव (प) या परिसरात महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने सन १९६० ते १९७० या कालावधीत आर्थिकदृष्टया दुर्बल गटातील लोकांसाठी वसाहती  निर्माण केल्या. या वसाहतीमधील बहुसंख्य लोक मराठी भाषिक मुंबई शहरात जुन्या चाळीमध्ये रहाणारे होते. परंतु मराठी भाषिकांच्या मुलांसाठी शाळेची सोय नव्हती. या परिस्थितीची जाणीव ठेऊन काही ध्येयवादी व शिक्षणप्रेमी व्यक्तींना घेऊन जून १९७४ साली पूर्व प्राथमिक विभागाचे वर्ग मोतीलाल नगर ३ भाडेकरु संघाच्या कार्यालयात सुरु केले. सुरुवातीला फक्त ३० विद्यार्थी होते. सन १९७५ मध्ये " ज्ञानमंदिर शिक्षण प्रसारक सभा" या नावाने संस्थेची रितसर नोंदणी धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे करण्यात आली.

सद्या संस्थेच्या विद्यालयाच्या दोन शाखा पूर्व प्राथमिक शाळा (बालवाडी) आणि प्राथमिक शाळा (पहिली ते चौथी)आहेत. शाळेत   एकूण १५० विद्यार्थी शिकत असून, ५ शिक्षिका व अन्य शिक्षकेतर कर्मचारी आहेत. संस्थेच्या विद्यालयातून अनेक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण उत्तमरित्या घेऊन आज डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स झाले आहेत. काहीजण स्वतंत्ररित्या व्यवसायही करत आहेत. काही सरकारी खात्यातील उच्च पदावर आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणखाते व इतर संस्थानी आयोजित केलेल्या विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन, प्रथम / व्दितीय क्रमांक मिळविले आहेत. याचे सर्व श्रेय हितचिंतक, संस्थेचे सभासद व शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी यांना जाते. या ५० वर्षात शाळेने शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी याच सुंदर मिळप साधला आहे. द्यानसोबत व्यक्तिमत्व विकास, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक सेवा या सर्व क्षेत्रात शाळेने आपला ठसा उमटविला आहे. आधुनिक शिक्षणाच्या गरज लक्षात घेऊन मातृभाषेच्या प्रेमाला  आणि संस्कराला न गमविता शाळेने आपला मार्ग चलू ठेवला आहे. शाळेने काळाची गरज ओळखली आणि सेमी-इंग्रजी माध्यम सुरू केले. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी मातृभाषेचा अभिमान बाळगूनही आधुनिक जगाशी जोडले गेले आहेत.  

bottom of page