लॉकडाऊन चालू झाले, रोजच्या बातम्या ऐकून फक्त करोनाचे रुग्ण किती वाढत आहे हे समजत होते. ऑफिसला हि सुट्टी असल्यामुळे खूप कंटाळा यायचा. कुठे बाहेर जायचे नाही, सर्व ठप्प झाले होते, भीती वाटायची असं हे रोज चालूच होत .
पण ११ एप्रिलला माझ्या मनात असाच विचार आला आणि देवगडचे आंबे विकायचे ठरवले आणि रात्री १२ वाजता पोस्ट केली आणि हि पोस्ट अशी काही फॉरवर्ड झाली मी त्याचा विचारही कधी केला नव्हता कि मी ४ दिवस फोन खाली ठेवू शकली नाही एवढा छान प्रतिसाद मिळाला मला.
महाराष्ट्रतल्या कान्या कोपऱ्यातून कोल्हापूर , सांगली , कराड , चिपळूण, पुणे, नाशिक, धुळे असे बऱ्याच ठिकाणावरून फोन आले .
त्यात एक फोन शुभांगी तिरोडकर , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्हॉइस प्रेसिडेंट यांनी जी कौतुकाची थाप दिली कि आजून जोमाने काम करण्याची ऊर्जा आली .
पहिली १५० पेटीची बुकिंग १४ एप्रिलला पूर्ण झाली आणि अशी हि छान सुरवात झाली . यात सर्वजण माझ्या कुटुंबासारखेच मला मदत ही करत होते आणि साथही देत होते . करोना गेला कि आमच्याकडे यायचे असे आमंत्रण ही दिले, तर कोणी मला माझ्याकडचे आंबे वापरून केलेल्या रेसिपीज बनवून फोटो पाठवत होते आणि चांगले feedback देत होते. माझ्या एका मैत्रिणीचा मुलाने तर मला आंबे मावशी नाव ठेवलं तसंच काही न काही ऑडियो पाठवायचा, खूप बरं वाटायचं.
आंबे वितरण करताना प्रत्येक जण एवढी मदत करत होते कि कधी विचार हि केला नाही. डॉक्टर, पोलीस, सिनियर सिटीझन पर्यंत ते निर्मात्या पर्यंत मला निक्षींत मदत करत होते आणि आनंद हि घेत होते, जशी मी त्यांची फॅमिली मेंबर आहे . ड्राइव्हरला हि गाईड करत होते . रस्त्यात हॉटेलची सोय नसल्यामळे आंबे घेऊन आलेल्या ड्राइव्हरला चहा पाणी हि देत होते.
११ एप्रिल पासून जूनच्या पहिल्या आठवड्या पर्यंत कधी समजले ही नाही करोनाचे काय झाले ...
हे काम करताना बऱ्याच कठीण प्रसंगांना ही सामोरे जावे लागले, पण माझे आई बाबा माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले म्हणूनच मी प्रत्येक गोष्टीवर मात करू शकली .
मी ११ वर्षापूर्वी बघितलेले स्वप्न करोनामुळे सत्यात उतरलं.... आणि आता हे थांबणार नाही असंच चालू राहणार ......
थोडे मजेशीर स्क्रीन शॉट शेयर करतेय.......
खूपच छान थीम आहे त्यामुळे मी आज व्यक्त झाली ..... मनापासून धन्यवाद
Comments