top of page

महिषासुरमर्दिनी

काल परवाची गोष्ट कोरोनाच्या सर्वेक्षण ड्युटीवरून घरी जाताना पावलं झपाझप पडत होती.

नेहमीच्या रस्त्याने चालताना नेहमीप्रमाणे डावीकडे असलेल्या देवीच्या मंदिराकडे वळून नकळत हात जोडले गेले . आपल्याच तंद्रीत चालत असताना अचानक कानावर शब्द पडले . रस्ता तर बऱ्यापैकी सुनसान होता . मी आजूबाजूला नजर फिरवली . कुणीही बोलताना दिसलं नाही . मंदिराचं प्रवेशद्वार ही बंद होतं . तसं ते अनेकदा असतं , पण झटकन लक्षात आलं ,' अरे हो , नवरात्रोत्सव सुरू आहेत आणि ही मंदिर परिसरातली शांतता ! ' मनाची शांतता मात्र भंग पावली त्या आवाजाने . कान तीक्ष्ण करून मी कानोसा घेतला तर चक्क , मंदिराच्या आतून कुजबुज ऐकू आली .मी मुख्य द्वाराच्या लोखंडी गजातून गाभाऱ्याकडे श्वास रोखून पाहिले . नकळत डोळे पाणावले होते . ' भर नवरात्र उत्सवात गाभाऱ्यात मंद तेवणाऱ्या समईच्या प्रकाशात ती एकटी भक्तांना मिस करत असेल , नाही ? '

पहाते तर काय आश्चर्य ! भरजरी साडी , गळाभर अलंकार , डोक्यावर चमचमता मुकुट , हातात तळपणारी शस्त्रे , भाळावर कुंकवाचा मळवट , टपोरे डोळे , स्नेहमय दृष्टी आणि प्रसन्न मुद्रा ! इतक्या दुरुनही मला तिच्या चेहेऱ्यावरच स्मितहास्य स्पष्ट दिसत होतं . आदिशक्तीच रूप असलेली ती देवीची प्रसन्न मुद्रा बोलत असल्याचा भास झाला . धीरगंभीर आवाज माझ्या मनापर्यंत पोहोचत होता . " खरं सांगू , मी अगदी शांत आहे .. गेल्या कित्येक वर्षांत अशी शांतता दुर्मिळ झाली होती .. मला प्रसन्न करण्यासाठी माझे मोठमोठे (स्वतःला समजणारे) भक्तगण खूप काही करत असतात . डोक्यावरच्या मुकुटापासून ते हातातल्या आयुधांपर्यंत सगळं काही सोन्याचं त्यांनीच मला दिलं . ही गाभाऱ्याची महिरप त्यांनीच चांदीची बनवली . ढोल ताश्यांच्या गजरात गुलाल उधळीत माझी पालखी खांद्यावर घेण्यासाठी चढाओढ लागत असे . पूजाअर्चा , होमहवन , आरती भजन ,धूप दिप , नैवैद्य सगळं कसं राजेशाही थाटात होत होतं .कुणीतरी ठरवून दिलेल्या रंगाने परिसर फुलून येत होता . अनेकजण तर नऊ दिवस अनवाणी फिरत होते . मलाही भक्तांच्या भक्तीला येणारं उधाण दरवर्षी अधिकाधिक वाढताना पाहून आनंद होत होता पण ... "

" पण काय , माते ? यावर्षी हे असं का दूर ठेवलंस आम्हा भक्तांना ? तूतरअष्टभुजामहिषासुरमर्दिनी ! पणडोळ्यांनाहीनदिसणाऱ्या त्या विषाणूचा अजून तू संहार का केला नाहीस ? " माझ्या तोंडून नकळत प्रश्न बाहेर पडला .

" काय सांगू तुला ? मी पहात होते ,भक्तिभावाने ओटी भरायला येणाऱ्या तुझ्यासारख्या बायकांना माझं दर्शन सुध्दा धड घेता येत नव्हतं , त्यांनी आणलेली ओटी .. त्यातल्या माझ्यासाठी आणलेल्या वेण्या , बांगड्या , खण , नारळ त्यांच्या हातातून माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच वेगवेगळे ढिगाऱ्यात फेकले जायचे . गर्दीला पूर येत असे आणि मग ओळखीपाळखीने आलेल्यांना दर्शन रांगेत उभे न राहता थेट माझी भेट घडत असे .. आणि रांगेत उभे असलेल्याना बखोटीला धरून पुढे ढकललं जाई . अर्थातच भोळी श्रद्धा डोळे मिटून माझं रूप आठवून नमस्कार करी . रात्रंदिवस श्लोक , स्तोत्रं , भजन , जागरण , गोंधळ याच बरोबर हिंदी , मराठी गीतांचे श्रवण करावे लागे . रात्री दणक्यात होणारा दांडिया रास तर अत्यंत लोकप्रिय .. किंबहुना त्यासाठीच माझे भक्त (कि दांडियाचे) अगदी घराघरांत निर्माण होत होते . सगळा पैशांचा खेळ सुरू झाला होता . श्रीमंतांसोबत गरीब ही यात नकळतपणे ओढला जात होता .. ते ही माझं नाव पुढे करून ! "

मी तोंडाचा वासलेला आ अजून तसाच होता . स्वतःला सावरत मी म्हटलं ," माते , काही झालं तरी आम्ही लेकरं तुझी .. अशी शिक्षा नको देऊस . आता एकदा माफ करून टाक ."

" छे छे .. ही शिक्षा नाहीच . ही केवळ तुम्हाला जाणीव व्हावी म्हणून छडी उगारली आहे , मारली नाहीच .. पण यातून धडा घ्या , विचार करा . महिषासुर मर्दिनी हे केवळ माझं नाव नाही तर तो माझा स्वभाव आहे .. खऱ्याभक्तांचंरक्षणआणिदुष्टांचासंहारकरण्यासाठीतरमीपृथ्वीतलावरअवतारघेते . मलाभक्तीचेमुखवटेभुलवूशकतनाहीत . सोन्याचेकळसमलाविकतघेऊशकतनाहीत . मलाभूलपडतेतीफक्तआणिफक्तनिस्वार्थीभक्तीची . आजसंकटातसापडलेल्यानामदतकरणाऱ्यांचेहातबनून , डॉक्टरनर्सेसचीजिद्दबनून , पोलिसांच्याहातातलीकाठीबनूनतुमच्यासाठीअहोरात्रजागतेयमी . पणतुमचाफाजीलआत्मविश्वासतुम्हालासोडावालागेल , तरचतुम्हीपुन्हाएकदानव्यानेजीवनजगूशकाल .. पुन्हाएकदासांगते . माणूसआहात , माणसासारखेवागा . स्वतःजगा , इतरांनाजगूद्या ! मीजशीइथेआहेतशीचसगळीकडेआहे . पणमलातुमच्यामनाच्यागाभाऱ्यातराहायलासर्वांतजास्तआवडते .."

आता मात्र माझे हात पाय घामाने ओले झाले आणि डोळे भरून आल्याने गाभाऱ्यातली तेजस्वी मूर्ती देखील धूसर दिसू लागली . नकळत दोन्ही हात जोडले गेले . जड अंतःकरणाने मी पायऱ्या उतरून घराचा रस्ता धरला . आज मी देवीचा खरा रंग आणि खरं रूप पाहिलं होतं .


नूतन बांदेकर

9773445808


7 views0 comments

Comentários


bottom of page