top of page

उत्सव स्त्रीशक्तीचा


सकाळीच स्टेशनमध्ये शिरतानांच लक्ष वेधून घेतलं ते पिवळ्या रंगाने. सगळीकडे पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा पाहताना मन नकळत प्रफुल्लित झालं. पुढे प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पहाताना आजूबाजूच्या सगळ्याजणी नटलेल्या, सजलेल्या पाहून एकदम लक्षात आलं. आज अश्विन शुद्ध प्रतिपदा शारदीय नवरात्रारंभ! विश्वाचा आधार असलेली आदिमाया, आदिशक्ती म्हणजे निरंतर ऊर्जा! मांगल्याचे प्रतीक असणारी प्रसन्न मुद्रा, तशीच दैत्यांचा संहार करणारी अष्टभुजा, राक्षसी वृत्ती पासून तारणारी दुर्गा, तर सगळ्यांचा सांभाळ करणारी जगतजननी होय!

वर्षभरात ऋतूपरत्वे मुख्यतः चार वेळा हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो वसंत नवरात्री, आषाढ नवरात्री, शारदा नवरात्री आणि पौष किंवा माघ नवरात्री यापैकी शरद ऋतूत येणारी शारदीय नवरात्री ही महानवरात्री म्हणून ओळखली जाते. याउत्सवातदुर्गेच्यामुख्यतीनरूपांचाउत्सवसाजराहोतोमहालक्ष्मी, महासरस्वतीआणिमहाकाली! यातिन्हीरूपातीलतिचामहिमाअगाधआहे. अंबा, जगदंबा, अन्नपूर्णा, भद्रकाली, सप्तशृंगी, भैरवी, शुभंकरी, चंडिका, रेणुका, चामुंडी, यल्लम्मा, भ्रामरी, कात्यायनी, शैलपुत्री, शाकंभरी, त्रिपुरसुंदरी, ललिता, भवानी, मूकंबिका, नारायणी अशा विविध नामांनी आपल्या भक्तगणांना प्रचिती देणारी आदिमाया आपल्याला अनेक रूपात भेटते. वेगवेगळ्याप्रकारेतिचीआराधनाकेलीजाते. सहस्रनामावलीपठणकरूनतिचेस्मरणकेलेजाते.

नवरात्रोत्सवात सारेच भक्तगण या आदिमाया आदिशक्तीच्या पायाशी लीन होऊन तिच्या आशीर्वादाची आस बाळगतात. पारंपारिक पद्धतीने पूजन-अर्चन, उपासना करून देवीला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

मला मात्र राहून राहून एकच प्रश्न पडतो तो म्हणजे, तिच्या पायाशी एवढी लीन असलेली भक्त मंडळी, आपल्या आजूबाजूला ज्या जित्याजागत्या दुर्गा, रेणुका, अंबा वावरत असतात त्यांच्यातल्या दैवी अंशाला नतमस्तक होतात का? ज्यास्त्रीशक्तीचेप्रतीकम्हणूनतिचीतिन्हीरुपेप्रकटहोतात, त्यास्त्रीशक्तीचाआदरकरून, तीमान्यकरणे, तिचेअस्तित्वजपणे या गोष्टी आज प्रगत म्हणवणाऱ्या समाजात सुद्धा दुर्मिळच आहेत. केवळ पुरुषाना नव्हे, तरस्त्रियांनादेखीलआपल्यातीलआदिशक्ती, आदिमायायांचीजाणीवझालीअसल्याचेअजूनहीदिसूनयेतनाही.

रामायण महाभारत यासारख्या महाकाव्यांमध्ये देखील याचीच प्रचिती येते. द्रौपदीच्या मदतीला कृष्ण धाव घेतो, तर सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मण रेषा मारतो. शेवटी ती स्त्री आणि पुरुष तिचा रक्षणकर्ता हे समीकरण तेंव्हा पासून जमून आलेलं दिसून येत. खरंतर द्रौपदी किंवा सीता या देखील आदिमाया आदिशक्तीची रूपे मानली जातात. परंतुप्रत्यक्षातत्यांनास्वतःचीआयुधमिळालेलीनाहीतकीत्यांनीकधीहीस्वतःचीशक्तीवापरलेलीनाही. त्यांच्यातल्यादुर्गाभवानीनेअष्टभुजाकिंवामहाकालीचेरूपधारणकेलेलंदिसतनाही. त्यासहनकरतराहिल्या, अग्निपरीक्षादेतचराहिल्या. शेवटीअसहाय्यतात्यांच्याहीवाट्यालाआली. आश्चर्यत्याचंचवाटतं, काळबदलला, तरीहीदेवीचंअस्तित्वसमाजमनानेफक्तनऊदिवसांच्याउत्सवापुरतंमर्यादितठेवलंआहे.

खरंतर शिक्षण हे सुद्धा महासरस्वतीच वरदान आहे. ते लाभलेल्या सुविद्य सरस्वती, हातात लेखणी घेतलेल्या या महासरस्वती, तसच नोकरी, व्यवसाय उद्योगात यशस्वी ठरलेल्या, कुटुंबाला टेकू देणाऱ्या महालक्ष्मीच नाहीत का? पण या सगळ्या महाकालीच रूप धारण करून दुष्टांचा संहार कधी करणार? की तिथेही कृष्णाचीच प्रतीक्षा? त्यांनाही लक्ष्मण रेषेचं भय!

भीती फक्त हीच की ही आदिशक्ती यापुढे तरी कधी जागी होणार की नाही? की फक्त हो ला हो म्हणत, नवरात्रीचे नऊ दिवस सुखात घालवून पुन्हा एकदा आपल्या जगात परत जाणार? जिथे पावलापावलावर दुर्योधन, दु:शासन असतील. लक्ष्मण रेषा मारणारे लक्ष्मण असतील, अग्निपरीक्षा घेणारे सत्पुरुष असतील आणि त्यांच्या भयाने तिचा श्वास कोंडला जाईल.

शिवरायांना तळपती तलवार देणारी तुळजाभवानी जिजाऊ होऊन स्वतः तळपली. ती आदिशक्ती पुन्हा जन्म घेणार आहे का? खरंच गरज आहे, महालक्ष्मी, महासरस्वती सोबत महाकालीची! जेंव्हा प्रत्येकीतली महाकाली, आदिशक्ती जागृत होईल तो खरा नवरात्रोत्सव! तेंव्हाच नऊ दिवसामध्ये दुर्गामातेचा खरा उत्सव साजरा होईल. नाहीतर, नेमेची येतो मग पावसाळा, तसं नेमेची येतो नवरात्रारंभ ..!

नेसुनव्यासाड्या .. अन .. होऊ रंगात दंग ..!

अंगभरदागिने .. अन .. चेहेऱ्यावरलावून रंग ..!


सौ.नूतन बांदेकर

9773445808


16 views0 comments

Comments


bottom of page